Posts

Showing posts from September, 2026

शिक्षक झालो नाही, घडत गेलो...

Image
 एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलाचा शिक्षक होण्यापर्यंतचा प्रवास                          कॅप्टन नवनाथ लवटे शिक्षक दिन म्हणजे केवळ शिक्षकांचा गौरव करण्याचा दिवस नाही, तर आपल्या शिक्षकत्वाच्या प्रवासाकडे मागे वळून पाहण्याचा दिवस आहे. आपण शिक्षक कसे झालो, आपल्याला या क्षेत्रात येण्याची प्रेरणा कुठून मिळाली आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनात आपण किती सकारात्मक बदल घडवून आणू शकलो, याचा विचार करण्याचा हा दिवस आहे. आज ५ सप्टेंबर शिक्षक दिनाच्या निमित्ताने माझ्या शिक्षक म्हणून झालेल्या प्रवासाकडे पाहताना मनात एकच विचार येतो—“मी शिक्षक झालो नाही; मी शिक्षक म्हणून घडत गेलो.” माझा जन्म १५ डिसेंबर १९८१ रोजी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मेडद या छोट्याशा गावात, आई बायडाबाई आणि वडील श्रीपती लवटे यांच्या शेतकरी कुटुंबात झाला. परिस्थिती अत्यंत सामान्य आणि आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल होती. मात्र आई-वडिलांनी परिस्थितीची जाणीव ठेवूनही शिक्षणाची प्रेरणा आणि संस्कारांची श्रीमंती दिली. आयुष्यात काहीतरी करायचे असेल तर शिक्षण हाच त...