Posts

शिक्षक झालो नाही, घडत गेलो...

Image
 एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलाचा शिक्षक होण्यापर्यंतचा प्रवास                          कॅप्टन नवनाथ लवटे शिक्षक दिन म्हणजे केवळ शिक्षकांचा गौरव करण्याचा दिवस नाही, तर आपल्या शिक्षकत्वाच्या प्रवासाकडे मागे वळून पाहण्याचा दिवस आहे. आपण शिक्षक कसे झालो, आपल्याला या क्षेत्रात येण्याची प्रेरणा कुठून मिळाली आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनात आपण किती सकारात्मक बदल घडवून आणू शकलो, याचा विचार करण्याचा हा दिवस आहे. आज ५ सप्टेंबर शिक्षक दिनाच्या निमित्ताने माझ्या शिक्षक म्हणून झालेल्या प्रवासाकडे पाहताना मनात एकच विचार येतो—“मी शिक्षक झालो नाही; मी शिक्षक म्हणून घडत गेलो.” माझा जन्म १५ डिसेंबर १९८१ रोजी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मेडद या छोट्याशा गावात, आई बायडाबाई आणि वडील श्रीपती लवटे यांच्या शेतकरी कुटुंबात झाला. परिस्थिती अत्यंत सामान्य आणि आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल होती. मात्र आई-वडिलांनी परिस्थितीची जाणीव ठेवूनही शिक्षणाची प्रेरणा आणि संस्कारांची श्रीमंती दिली. आयुष्यात काहीतरी करायचे असेल तर शिक्षण हाच त...

विद्यार्थी वाढदिवस उपक्रम अहवाल

Image
  रयत शिक्षण संस्थेचे महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, आष्टा तालुका : वाळवा जिल्हा : सांगली विद्यार्थी वाढदिवस उपक्रम अहवाल                               दिनांक : २५ जून २०२६ रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, आष्टा येथे शैक्षणिक गुणवत्ता वाढ व विकास उपक्रमांतर्गत इयत्ता बारावी वाणिज्य शाखेतील विद्यार्थिनी कुमारी समीक्षा श्रीरंग पाटील हिचा वाढदिवस गुरुवार दिनांक २५ जून २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास ज्युनिअर कॉलेजमधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच बारावी वाणिज्य शाखेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी इंग्रजी विषयाच्या शिक्षिका सौ. पाटील एस. एस. यांनी कुमारी समीक्षा पाटील हिला गुलाबपुष्प देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्येष्ठ शिक्षक श्री. अहिरेकर एन. जे. व श्री. फारणे आर. एस. यांनी विद्यार्थ्यांना वाढदिवसाचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच वाढदिवसानिमित्त विद्यालयाच्या व ज्युन...

महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, आष्टा शैक्षणिक व एनसीसी उपक्रमांचे डिजिटल व्यासपीठ

Image
  लेखक : कॅप्टन नवनाथ लवटे (M.com.M.A.B.Ed.DSM) एनसीसी विभाग प्रमुख व वाणिज्य प्राध्यापक स्वागत महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, आष्टा यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि एनसीसी उपक्रमांची माहिती विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या ब्लॉगची निर्मिती करण्यात आली आहे. आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शैक्षणिक साहित्य सहज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने या ब्लॉगद्वारे विविध विषयांच्या नोट्स, प्रश्नपत्रिका, अभ्यास साहित्य, एनसीसी मार्गदर्शन तसेच विद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती प्रकाशित करण्यात येणार आहे. ब्लॉगची प्रमुख वैशिष्ट्ये ✅ इयत्ता ११ वी व १२ वी वाणिज्य विषयांच्या नोट्स ✅ बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी अभ्यास साहित्य ✅ चिटणीसाची कार्यपद्धती विषय मार्गदर्शन ✅ वाणिज्य संघटन व व्यवस्थापन नोट्स ✅ सराव प्रश्नपत्रिका व घटक चाचण्या ✅ एनसीसी उपक्रम व मार्गदर्शन ✅ शालेय व महाविद्यालयीन कार्यक्रमांचे वृत्तांकन ✅ करिअर व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन एनसीसी विभाग एनसीसी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्व, देशभक्ती आणि सामाजिक बांधिलकी विकसित ...

महात्मा गांधी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

Image
  आष्टा, प्रतिनिधी : महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, आष्टा येथे २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास विद्यालयातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक तसेच आष्टा शहर व परिसरातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमासाठी योग प्रशिक्षक म्हणून प्रा. सूर्यकांत जुगदर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी विविध योगासने व प्राणायामाची प्रात्यक्षिके सादर करून योगाचे आरोग्यदायी महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. स्कूल कमिटी सदस्य बाबासाहेब सिद्ध व समीर गायकवाड यांनीही विद्यार्थ्यांना नियमित योगाभ्यासाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमास जायंट्स ग्रुप ऑफ आष्टाचे अध्यक्ष किरण काळोखे, सचिव सुनील सावंत, माजी अध्यक्ष सुनील माने (काका) तसेच जायंट्स ग्रुप इंटरनॅशनलचे सदस्य डॉ. सतीश बापट यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे प्राचार्य व्ही. एस. देवकाते यांनी प्रस्तावना करून विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तर पर्यवेक्षक ...

एका स्वप्नपूर्तीचा प्रवास

Image
 लेफ्टनंट नवनाथ लवटे – एका स्वप्नपूर्तीचा प्रवास                     निस्वार्थी स्वभाव, निर्धाराच्या पायघड्या, आणि शिक्षणाशी अतूट नातं लाभलेला एक प्रतिभावान शिक्षक म्हणजे लेफ्टनंट नवनाथ लवटे. १५ डिसेंबर १९८१ रोजी सोलापूर जिल्ह्यातील मेडद या लहानशा गावात जन्मलेला हा मुलगा, आई वडिलांच्या कष्टांच्या सावलीत वाढत, ज्ञानाच्या प्रकाशाकडे झेपावत गेला.                       प्राथमिक शिक्षणापासून ते एम.कॉम., बी.एड., अर्थशास्त्र व डी.एस.एम. सारख्या पदव्यांपर्यंतचा त्यांचा शिक्षणप्रवास म्हणजे जिद्द, चिकाटी व स्वावलंबन यांचं जिवंत उदाहरण आहे. 'कमवा आणि शिका' योजनेच्या आधारावर शिक्षण घेत असतानाच त्यांच्यातील शिक्षक घडत होता—जो केवळ शिकवतोच नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वासही निर्माण करतो.                     रयत शिक्षण संस्थेच्या माढा, लोणंद आणि आता आष्टा या विविध महाविद्यालयांत काम करताना त्यांनी केवळ अध्यापनच नाही, तर एनसीसी प्रशिक्षण,...

महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 2026

Image
  🏃‍♂️ महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती २०२६ 🛡️ शारीरिक क्षमता चाचणी (Physical Test Exam Pattern) महाराष्ट्र राज्यात पोलीस शिपाई भरती २०२६ ही अनेक तरुण-तरुणींसाठी स्वप्नपूर्तीची सुवर्णसंधी आहे. या भरती प्रक्रियेत लेखी परीक्षेसोबतच शारीरिक क्षमता चाचणी (Physical Test) ला विशेष महत्त्व दिले जाते. कारण पोलीस सेवेत शारीरिक तंदुरुस्ती, वेग, सहनशक्ती आणि ताकद अत्यावश्यक असते. या लेखात आपण पुरुष व महिला उमेदवारांसाठी शारीरिक चाचणीचा संपूर्ण नमुना (Exam Pattern) सोप्या शब्दांत समजून घेणार आहोत. 🔹 शारीरिक क्षमता चाचणी – 👉 एकूण गुण : 50 शारीरिक चाचणीमध्ये खालील तीन प्रकारांचा समावेश असतो: धावणे (Running),वेग (Speed) ,ताकद (Strength) 👮‍♂️ शारीरिक चाचणी – पुरुष उमेदवार (Physical Test for Males) पुरुष उमेदवारांसाठी खालीलप्रमाणे चाचण्या घेतल्या जातात: ✅ 1) 1600 मीटर धावणे (1600 m Running) गुण : 20 सहनशक्ती व श्वसनक्षमता तपासण्यासाठी ही चाचणी महत्त्वाची आहे. ✅ 2) 100 मीटर धावणे (100 m Running) गुण : 15 वेग, चपळता आणि प्रतिसादक्षमता तपासली जाते. ✅ 3) गोळाफेक (Shot Put) गुण : 15 हातांची ताकद, संत...

NCC B & C Certificate Examination 2026

Image
  NCC B & C Certificate Examination 🟢 NCC B और C प्रमाणपत्र परीक्षा : OMR शीट कैसे भरें? 🟢 NCC B & C Certificate Exam: How to Fill the OMR Sheet?   नमस्कार,          राष्ट्रीय कैडेट कोर (NCC) भारत सरकार के रक्षा मंत्रालय के अंतर्गत चलने वाला एक युवाओं का संगठन है। NCC का उद्देश्य छात्रों में अनुशासन, नेतृत्व, चरित्र निर्माण, राष्ट्रभक्ति और सेवा भावना विकसित करना है। स्कूल और कॉलेज स्तर पर NCC के माध्यम से कैडेट्स को सैन्य प्रशिक्षण, सामाजिक सेवा, आपदा प्रबंधन और राष्ट्रीय एकता का अनुभव दिया जाता है। NCC का आदर्श वाक्य है – “Unity and Discipline राष्ट्रीय कैडेट कोर (NCC) की B एवं C प्रमाणपत्र परीक्षा कैडेट्स के जीवन की एक महत्वपूर्ण परीक्षा होती है। इस परीक्षा में उत्तर लिखने के लिए OMR (Optical Mark Recognition) शीट का उपयोग किया जाता है। OMR शीट में की गई छोटी-सी गलती भी सही उत्तर होने के बावजूद अंक कटने का कारण बन सकती है। इसलिए OMR शीट को सावधानीपूर्वक और सही तरीके से भरना अत्यंत आवश्यक है। 📌 OMR शीट क्या ? OMR शीट एक ऐसी उत्तर पुस्तिका ...