महात्मा गांधी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

 



आष्टा, प्रतिनिधी : महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, आष्टा येथे २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास विद्यालयातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक तसेच आष्टा शहर व परिसरातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमासाठी योग प्रशिक्षक म्हणून प्रा. सूर्यकांत जुगदर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी विविध योगासने व प्राणायामाची प्रात्यक्षिके सादर करून योगाचे आरोग्यदायी महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. स्कूल कमिटी सदस्य बाबासाहेब सिद्ध व समीर गायकवाड यांनीही विद्यार्थ्यांना नियमित योगाभ्यासाचे महत्त्व पटवून दिले.

कार्यक्रमास जायंट्स ग्रुप ऑफ आष्टाचे अध्यक्ष किरण काळोखे, सचिव सुनील सावंत, माजी अध्यक्ष सुनील माने (काका) तसेच जायंट्स ग्रुप इंटरनॅशनलचे सदस्य डॉ. सतीश बापट यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे प्राचार्य व्ही. एस. देवकाते यांनी प्रस्तावना करून विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तर पर्यवेक्षक आर. बी. पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या कार्यक्रमात ज्युनिअर व सीनियर डिव्हिजनमधील एनसीसी कॅडेट्सनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. १६ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल संकेत चव्हाण यांच्या सूचनेनुसार एनसीसी कॅडेट्सनी विविध योगासने सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढविली.

कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन एनसीसी विभाग प्रमुख कॅप्टन नवनाथ लवटे व सेकंड ऑफिसर अभिषेक साळुंखे यांनी केले. योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनाचा संदेश देणारा हा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.





Comments

Popular posts from this blog

NCC B & C Certificate Examination 2026

महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 2026

सांगली जिल्ह्यात बारावीची बोर्ड परीक्षा : कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात पार पडणार