विद्यार्थी वाढदिवस उपक्रम अहवाल
रयत शिक्षण संस्थेचे
महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, आष्टा
तालुका : वाळवा जिल्हा : सांगली
विद्यार्थी वाढदिवस उपक्रम अहवाल
दिनांक : २५ जून २०२६
रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, आष्टा येथे शैक्षणिक गुणवत्ता वाढ व विकास उपक्रमांतर्गत इयत्ता बारावी वाणिज्य शाखेतील विद्यार्थिनी कुमारी समीक्षा श्रीरंग पाटील हिचा वाढदिवस गुरुवार दिनांक २५ जून २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास ज्युनिअर कॉलेजमधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच बारावी वाणिज्य शाखेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी इंग्रजी विषयाच्या शिक्षिका सौ. पाटील एस. एस. यांनी कुमारी समीक्षा पाटील हिला गुलाबपुष्प देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी ज्येष्ठ शिक्षक श्री. अहिरेकर एन. जे. व श्री. फारणे आर. एस. यांनी विद्यार्थ्यांना वाढदिवसाचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच वाढदिवसानिमित्त विद्यालयाच्या व ज्युनिअर कॉलेजच्या ग्रंथालयाला पुस्तके, शैक्षणिक साहित्य अथवा वृक्ष भेट देण्याचे आवाहन करून सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचा संदेश दिला.
बारावी वाणिज्य शाखेचे वर्गशिक्षक श्री. देसाई एस. एन. तसेच वाणिज्य विभाग प्रमुख श्री. लवटे एन. एस. यांनी विद्यार्थ्यांच्या वर्षभर साजऱ्या होणाऱ्या वाढदिवसांचे नियोजन केले असून या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, वाचनसंस्कृती आणि पर्यावरणप्रेम वाढीस लागण्यास मदत होत आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी ज्युनिअर कॉलेजमधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी कुमारी समीक्षा पाटील हिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम आनंददायी व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

Comments
Post a Comment