जिल्हा परिषद पंचायत समिती एक अनुभव
🌼 आभार व शुभेच्छा संदेश 🌸
जिल्हा परिषद सांगली व पंचायत समिती वाळवा सार्वत्रिक निवडणूक २०२६ या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये मला केंद्राध्यक्ष म्हणून निवडणूक कर्तव्य पार पाडण्याची संधी मिळाली.
या निवडणूक प्रक्रियेदरम्यान मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, तसेच आमच्या झोनचे क्षेत्रीय (झोनल) अधिकारी मा. माळी साहेब यांनी अतिशय उत्तम नियोजन व सहकार्य केले. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया कोणत्याही अडचणीशिवाय, शांततेत व संविधानिक पद्धतीने पार पडली.
मी यापूर्वी ७ ते ८ वेळा निवडणूक प्रक्रियेत निवडणूक कर्मचारी म्हणून सहभागी झालो आहे; मात्र यावेळी BU, CU तसेच इतर साहित्य जमा-वाटपाची प्रक्रिया अत्यंत सुव्यवस्थित व सुयोग्य नियोजनाने पार पडली, हा एक अतिशय चांगला आणि समाधानकारक अनुभव ठरला.
तसेच निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी जेवणाचे उत्कृष्ट नियोजन, कोणताही त्रास न होणे आणि मानधन योग्य पद्धतीने व वेळेत देण्यात आल्याबद्दल संबंधित सर्व प्रशासनाचे मनःपूर्वक आभार.
केंद्र क्रमांक २४, कासेगाव
गट ३८, गण ७६
येथील केंद्रप्रमुख या नात्याने मी
लेफ्टनंट नवनाथ लवटे
सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी व प्रशासनाचे
मनःपूर्वक आभार व्यक्त करीत आहे. 🙏🌺

Comments
Post a Comment